“आम्ही शिक्षकांसाठी शिक्षक म्हणून लढतो” — दत्तात्रय सावंत

शाळा भेटीतून शिक्षकांशी थेट संवाद; प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार

 

शिवसंदेश NEWS | विशेष प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी विविध शाळांना भेटी देत शिक्षक बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी शिक्षकांनी दैनंदिन शैक्षणिक कामकाजात येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच आपल्या विविध अपेक्षा सावंत यांच्यासमोर मांडल्या.

शिक्षकांच्या प्रश्नांची वस्तुस्थिती आणि त्यांची तीव्रता समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष शाळा भेटी व शिक्षकांशी संवाद आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले. “आम्ही शिक्षकांसाठी शिक्षक म्हणून लढतो,” असे स्पष्ट करत शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य पातळीवर आवाज उठविण्याची भूमिका त्यांनी मांडली.

शिक्षकांनी मांडलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. शाळा भेटी आणि शिक्षक संवादाच्या माध्यमातून शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेण्याच्या या उपक्रमाला शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *