महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

No photo description available.
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩*
_१ मे २०२६ –
६६ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन
💐💐💐💐💐
*भगवा फेटा, कपाळी कुंकू, उरी अभिमान…*
*हाच तो आमचा महाराष्ट्र, स्वाभिमानाचा मान !*
आज १ मे…
*१०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने* मिळालेला दिवस.
*संयुक्त महाराष्ट्राच्या* लढ्याला यश मिळालेला दिवस.
*छत्रपती शिवरायांच्या* स्वराज्याचे स्वप्न,
*यशवंतराव चव्हाणांच्या* कर्तृत्वाने पूर्णत्वाला गेलेला दिवस.
*सह्याद्रीसारखा कणखर,*
*शिवरायांसारखा पराक्रमी,*
*ज्ञानोबा-तुकोबासारखा पवित्र,*
*आणि फुले-शाहू-आंबेडकरांसारखा समतेचा पुरस्कर्ता*
*असा हा आपला महाराष्ट्र !*
मराठी मातीत जन्मलो याचा सार्थ अभिमान आहे.
मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता
जपण्याची शपथ आज पुन्हा घेऊया.
*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…*
*जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…*
*जय जय महाराष्ट्र माझा 🚩*
*जय भवानी जय शिवाजी 🚩*
*भारत माता की जय 🚩*
*सर्व मराठी बांधव-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !*

– सीमाकवी रवींद्र पाटील

See less

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *